दोघे भावांचे घर जळून खाक
पातुर तालुक्यातील राहेर येथील घटना
दहा लाखांच्या जवळपास नुकसान
योगेश नागोलकार
रोखठोक न्यूज
राहेर:-पातुर तालुक्यातील राहेर येथे अचानक बंद घरात घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा भडका झाल्याची घटना शनिवार दि.१ मार्च रोजी २:३० वाजताच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. प्राप्त माहितीनुसार राहेर येथील गजानन वामन पाचपोर व ज्ञानेश्वर वामन पाचपोर या दोन्ही भावांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

गावकऱ्यांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला या आगीत टीव्ही, फ्रीज, कपाट,कुलर,शिलाई मशीन , धान्य, बिजवाई, शासकीय कागदपत्रे, कपडे,टायर पैसे ,सोने,आदी
साहित्याचे दहा लाखांच्या जवळपास नुकसान झाल्याचे गजानन पाचपोर व ज्ञानेश्वर पाचपोर यांनी सांगितले आहे.. यामध्ये बहुतांश जीवनाशक साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने घरात कुणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच चान्नी येथील पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करण्यात आला. यामध्ये दोन्ही भावाचा त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. तरी शासनाने तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.तहसीलदार राहुल वानखेडे यांच्या आदेशानुसार तलाठी मिलिंद इचे, मंडळ अधिकारी सतिष ढोरे, मंगेश बोराडे,यांनी सुद्धा घटनेचा पंचनामा करून तहसीलदार यांच्याकडे प्राथमिक अहवाल सादर केला आहे. या घटनेमुळे गावांसह परिसरात एकच खळबळ उडाली होती.
