अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिरला अंधारे येथील विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना माती परीक्षण प्रात्यक्षिक बद्दल माहिती दिली आणि
माती परीक्षण करते वेळी घ्यावयाची काळजी याबद्दल विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली, तसेच माती परीक्षण करण्याची योग्य प्रक्रिया त्यांना प्रात्यक्षिकासह समजावून सांगितली व शेतकऱ्यांना माती परीक्षणाचे फायदे सागितले.
यावेळी शेतकऱ्यांच्या शंका तेथे उपस्थित विद्यार्थ्यांनी दूर केल्या. याबद्दल कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रथमेश महाजन, निलेश खोपे, गौरव गावंडे, आशुतोष रनवारे यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली.
यावेळी *अस्टुल* गावातील शेतकऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या उपक्रमासाठी श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राम खर्डे, कार्यक्रम अधिकारी प्रा. शिव कुमार राठोड प्रा श्रद्धा चव्हाण ,कार्यक्रम समन्वयक प्रा. सागर भगत, प्रा.पांडुरंग जाधव विषयतज्ञ प्रा. हर्षल पोरे यांचे मार्गदर्शन लाभले.
