पातूर : अकोला जिल्ह्यातील सर्वात भ्रष्ट समजल्या जाणाऱ्या पातूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून आज नविन अधिकारी पदावर रुजू झाले आहेत.पातूर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी अगर्ते यांनी प्रभार स्विकारुन जेमतेम काळच लोटला असता येथील स्थानिक राजकारणामुळे कामाचा ताण नं झेपल्याने त्यांनी आजारी रजा टाकल्यामुळे सदर पद रिक्त होते.त्यामुळे पंचायत समितीच्या सर्वच विभागाचे काम रखडले होते.त्यामुळे आज दि.१७ जानेवारी रोजी मूर्तिजापूर येथे सहाय्यक गटविकास अधिकारी असलेले सुभाष काळे यांनी पातूर पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. काळे हे शिस्तप्रिय अधिकारी असून पातुर पंचायत समितीमध्ये चाललेला गोंधळ कारभार वठणीवर आणण्याचे ते काम करतील अशी अपेक्षा जनता करीत आहेत.यावेळी पंचायत समितीच्या सर्व अधिकारी,कर्मचारी यांची औपचारिक भेट घेऊन ओळख करून घेतली. पातूर पंचायत समितीचे यु.एन.घुले,कपिल पवार,वसंत चव्हाण,नितीन जोशी,दिनकर घुगे,गणेश बागडे,ओम पुरी यांनी नव्याने रुजू झालेल्या गटविकास अधिकारी सुभाष काळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. स्थानिक राजकारणाने गढूळ झालेल्या पातूर पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचारामध्ये जिल्हाभरात नावलौकिक मिळविले असून येथे अक्षरशः जंगलराज सुरूआहे.जिल्ह्यातील सर्वात भ्रष्ट समजल्या जाणाऱ्या या पंचायत समितीमध्ये नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी काही बदल घडवतील की याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष आहे.
