पातुर तालुका पत्रकार संघटनेकडून कठोर कारवाईची मागणी
पातूर: अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन अंतर्गत कोळंबी येथे पत्रकारावर हल्ला प्रकरणी पत्रकार संघटनेकडून १९ जून रोजी पातूर तहसीलदार यांना निवेदन सादर करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला असून, हल्लेखोराविरुद्ध पत्रकार संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, कोळंबी नजीक एका धाब्यावर डिझेल पेट्रोलचा काळाबाजार होत असल्याचे चित्रीकरण करण्यासाठी गेलेले पत्रकार अजय वसंतराव परभे यांच्यावर हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला,या हल्ल्यात पत्रकार अजय परभे गंभीर जखमी झाले, हल्लेखोराविरुद्ध कठोर कारवाईची मागणी पातुर तालुका पत्रकार संघटनेकडून पातुरचे तहसीलदार यांना १९ मे रोजी दिलेल्या निवेदनातून केली आहे.
——————————————————————–
या पत्रकारांनी दिले निवेदन
यावेळी सतीश सरोदे,मोहन जोशी,उमेश देशमुख,अब्दुल कुद्दुस, प्रदीप काळपांडे, श्रीकृष्ण शेगोकार, नासीर शेख,सय्यद साजीद, निखिल इंगळे, संगीताताई इंगळे,गोपाल राठोड, दुले खान, श्रीकृष्ण लखाडे, राहुल देशमुख,सुमित भालतीळक, नातिक शेख, प्रमोद कढोने,निशांत गवई,अब्दुल जफर,मो. शोएब, किरण निमकांडे, नाजीम शेख,