पातुर प्रतिनिधी:-(संगीता इंगळे)
आमदार डॉ राहुल पाटील शैक्षणिक संकुलाच्या अंतर्गत येणाऱ्या नलिनीताई राऊत ग्रामीण आयुर्वेद रुग्णालय लवकरच महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या कक्षेत येणार असल्याने या भागातील रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे,
गुरुवारी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या कक्षात झालेल्या बैठकीत शासनाच्या विविध योजनेचा आढावा घेण्यात आला यामध्ये जिल्हा भरातील सर्व रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते,
पातुर येथील आयुर्वेद रुग्णालयाने केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख यावेळी शल्य चिकित्सक तुरुंग तुषार वारे व जिल्हा आरोग्य अधिकारी बीबी गाढवे यांनी केला,प्राथमिक आरोग्य केंद्र पातुर च्या कक्षेत येणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया आयुर्वेद रुग्णालयात पार पडतात व त्यांचे चांगले सहकार्य असते हे ऐकून जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सुद्धा अशा रुग्णालयासाठी शासनाच्या सर्व योजना लागू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे अशा सूचना संबंधित योजनेच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत,
महाविद्यालयाचे संचालक डॉ साजिद शेख यांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या सामाजिक शिबिराचा देखील अहवाल रुग्णालयाचे प्रतिनिधी म्हणून धनंजय मिश्रा यांनी जिल्हा अधिकारी अजित कुंभार यांच्याकडे सादर केला,
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ जयश्री काटोले उप प्राचार्य अभय भुस्कडे शिबिर समन्वयक सुनिता कदम रुग्णालय अधीक्षिका गायत्री मावळे उप अधीक्षक अब्दुल वसीम यांच्या समन्वयाने पार पडलेल्या शिबिराला नुकतेच शासनाद्वारे सन्मानित केल्याबद्दल सर्वांनी समाधान व्यक्त केले,
केंद्र व राज्य शासनाच्या शर्ती व अटीची पूर्तता करून लवकरच पातुर येथील आयुर्वेद रुग्णालय महात्मा फुले जन आरोग्य योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच आयुष्यमान भारत व राज्य शासनाच्या विविध योजनेखाली आणण्यासाठी आम्ही निश्चितच प्रयत्न करू ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे असे महाविद्यालयाचे संचालक साजिद शेख यांनी यावेळी बोलताना सांगितले,
पातुर येथील नलिनीताई आयुर्वेद रुग्णालयाने राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य कार्यक्रमात आपली भूमिका निभावली आहे त्यामुळे या भागातील रुग्णांना त्याचा अधिक फायदा होत आहे भविष्यात शासनाच्या अशा योजना रुग्णालयात लागू झाल्यास मोठ्या शस्त्रक्रिया पातुर येथील रुग्णालयातच पार पडणार आहेत अशी ही माहिती साजिद शेख यांनी यावेळी दिली
