पातुर :- सर्पमित्र,समाज सेवक बाळ काळणे यांचा राज राजेश्वर मंदिरात सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमात सर्पमित्र बाळ काळणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.राजेश्वर मंदिरामुळे सर्पसेवेचे बीज रोवल्या गेले होते.लहानपणी ज्यावेळी आई व इतर महिलांसोबत राजेश्वर मंदिराच्या दर्शनाला श्रावण महिन्यात आम्ही जात होतो . त्यावेळी रबराचे कागदी साप तिथे मिळायचे वीस तीस (20/30)पैशाला ते साप मला देतील तरच मी मंदिरात जायचो ! याच अटीवर ते साप मग आणुन राहत्या चाळीतील लोकांना दाखवायचो व खेळवायचो.राजेश्वर मंदिर कारणीभूत हाच सर्प संस्काराचा भाग सर्पसेवेत व वन्यजिव सेवेत महावृक्ष झाला आहे.लहानपण हे संस्कारातुन जात असते. त्यामुळे ते बुद्धीत चिटकुन राहते.शिक्षण हे विसरल्या जाते कारण ते फक्त शिकल्या जाते परंतू संस्कार हे रूजविल्या जात असतात. त्यामुळे ते कधीच विसरल्या जात नाही.आज ह्या महाआराध्य दैवत ठिकाणी माझ्या सेवेचा सत्कार झाला . त्यामुळे फार आनंद झाला . सत्कार,पुरस्कार हा धार्मिक , सामाजिक, की राजकीय असो.तो आपल्या सेवेचा होतो व्यक्ति हा माध्यम असतो. हा कुणीही केला,कुठेही व कोणत्याही स्वरूपात झाला . तरी आपल्या सेवेची किंमत ही अधिक अनमोल होते . सेवेचा उत्साह वाढत राहतो. राजेश्वर मंदिर समितीचे आभार व्यक्त करतो – जय भोलेनाथ – सर्पमित्र तथा मानद वन्यजिव रक्षक बाळ काळणे