पीके वाचवन्यासाठी शेतकरी रात्रं दिवस शेतात
आलेगाव दी ८ प्रतिनिधि उधार उसनवारी व् पिक कर्ज काढून पेरलेल्या पिकाला वन्यप्राणी फस्त करीत असून,पिक वाचवन्यासाठी शेतकरी वर्ग जिव धोक्यात घालवून शेतात रात्रभर डोळा बंद न करता पिकाची रखवाली करतांना प्लास्टिक कागदाच्या झोपडीमध्ये गावंडगाव,मळसूर,गोळेगाव,आलेगाव चिंचखेड़ा शिवारातील शेतकरी दिसून येत आहेत.पातुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिप पिकांची १००% पेरणी केलि असून सदर पिक पेरणी करीता अनेक शेतकऱ्यांनी बँक पिक कर्ज,तर अनेक शेतकऱ्यांनी थकित बँक कर्जामुळे,उधार उसनवारी करूण खरिप पिकाची पेरणी केलि असून सदर पीके चांगली डोलायला लागली असतांना वन्यप्रान्यांची कड़पेची कड़पे शेतकऱ्यांच्या शेतपिकांना फस्त करीत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना पीके वाचवन्यासाठी हींसक प्राण्याची भीति मनात ठेऊन जीवाची पर्वा न करता शेतातच प्लास्टिक कागदाच्या झोपडया करूण पिकाचे रक्षण डोळे बंद न करता रात्रं दिवस करावे लागत आहे.वन्यप्रान्यांच्या नुकसानीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई ही अल्प मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले असून सदर रक्कम ही वर्षभर मिळत नसल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.सदर रक्कम ही अर्ज केल्यापासून एक महिन्याच्या आत मिळावी अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.

विमा कंपनी कडून शेतकऱ्यांची थट्टा
गावंडगाव येथील सुभद्रा श्रीराम राठोड यांचे कड़े चार एक्कर शेती असून त्यांनी गतवर्षी प्रधानमन्त्री पिक विमा योजने अंतर्गत चार एक्कर सोयाबीन तुर पिकाचा विमा काढला असता विमा कंपनीने त्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई म्हणून अल्प १६०० रूपये टाकले असल्याचे त्यांनी सांगितले असून विमा कंपनी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अल्प आर्थिक मद्त टाकून शेतकर्यांची विमा कंपनी चांगलीच थट्टा करीत असल्याचे शेतकऱ्यां मध्ये तीव्र संतापाने बोलले जात असून अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये विमा कंपनी कडूनअल्प मद्त मिळाल्याने शेतकरी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. सरकारने ७२ तासाची अट रद्द करावी.

नैसर्गिक आपत्ति मध्ये खरिप पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी विमा कंपनिकड़े ७२ तासा पर्यन्त तक्रार नोंदवावी ही अट शेतकऱ्यांसाठी जाचक ठरत असून अनेक शेतकऱ्यांना ही अट पूर्ण करण्यासाठी अनेक समस्या निर्माण होत असल्यामुळे,सरकारने ही अट रदद् करूण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २५% एवजी सरसकट विमा लागू करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.