पातुर प्रतिनिधी:-(संगीता इंगळे) पातुर शहरात पोलिसांचे हेल्मेट मोटरसायकल रॅलीचे पतसंचलन करण्यात आले.

अकोला पोलीस अधीक्षक माननीय बच्चन सिंह यांच्या आदेशानुसार,पातुर पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार गजानन तडसे यांच्या मार्गदर्शनाखाली.पातुर पोलीस स्टेशनच्या वतीने हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.पातुर शहरात जुने बस स्टॅन्ड चौक, मिलिंद नगर चौक,संभाजी चौक,या मुख्य मार्गाने हेल्मेट व मोटरसायकल ची रॅली काढण्यात आली. नागरिकांनी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे.नियमाचे पालन करा,हेल्मेट वापरा,संयम पाळा व दुर्घटना टाळा, हेल्मेट वापरा आपला जीव वाचवा.असे आवाहन पातुर पोलीस यांनी केले.

यावेळी पातुर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक बंडूजी मेश्राम,उपनिरीक्षक अभिषेक नवघरे यांच्यासह पोलिसमलदार,दामिनी पथक च्या महिला पोलीस अनिता नागनाथ,सरस्वती सोनोणे, ट्राॅफिक पोलीस मनोज सिंह ठाकुर,ज्ञानेश्वर चिकटे,पातुर तालुका पथक होमगार्ड विठ्ठल राठोड,गजानन घेघाटे,वसंता वानखडे,कुंदन गाडगे,विकास अत्तरकार,चेतनराठोड,स्वप्नल गणेश,संजय शिरसाट,श्याम शेगोकार,विठ्ठल ढगे,गणेश हरणे यांनी हेल्मेट रॅलीमध्ये सहभाग घेतला होता.तसेच पोलीस कर्मचारी व पातुर शहरातील नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. मुख्य मार्गाने पतसंंचालन करून या रॅलीचे संभाजी चौकापासून ते पोलीस स्टेशन येथे समारोप करण्यात आला.