पातुर(प्रतिनिधी)-नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणेचा वर्ग बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर झाला असून यामध्ये वसंतराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातूरचा ९७.३३ टक्के निकाल लागला आहे.या कनिष्ठ महाविद्यालयाने अनेक वर्षापासून चालत आलेली आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा या वर्षी सुद्धा कायम ठेवली आहे.वसंतराव नाईक विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मधून एकूण ७५ विद्यार्थी विज्ञान शाखेत परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते.यामधून ७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या कनिष्ठ महाविद्यालया मधून कु.अंजली राजेश ऊगले हिने महाविद्यालयातून ७४.०० % गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला तसेच कु.पौर्णिमा किशोर तायडे हिने ६८.५० % गुण प्राप्त करून महाविद्यालयातून द्वितीय क्रमांक प्राप्त केला,कु.नयना गजानन वसतकार हिने ६८.३३ % गुण प्राप्त करून तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली,कु.दिव्या अजाबराव सुरवाडे ६७.६७,कु.तन्वी दिनकर गाडगे ६५.६७ %,कु. नियती अशोक ठाकरे ६५.१७ % कु.श्रुती अरुण वेलकर ६४.५० % आदींसह विद्यालयातून एकूण २३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले तर ४० विद्यार्थी द्वितीय श्रेणी उत्तीर्ण झाले आहेत.महाविद्यालयाच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक,सचिव मा.श्री रामसिंगजी जाधव साहेब व प्राचार्य श्री.एस.एम.सौंदळे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.
कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा