पातुर प्रतिनिधी पातुर तालुक्यातील शिरला ग्रामपंचायत ही भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांनी बरबटली असून या भ्रष्टाचार वृत्तीला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाठबळ असल्याने नागरिकांचे अतोनात आर्थिक शोषण चालू आहे पातुर तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून शिरला ग्रामपंचायत ओळखले जाते या ग्रामपंचायतीमध्ये पातुर शहराचा काही भाग समाविष्ट झाल्याने ग्रामपंचायतचे आर्थिक स्तोत्र वाढले आहे ग्रामपंचायत बांधकाम परवानगी मध्ये प्रचंड प्रमाणात कर वसुली करते या करवसुलीचा ग्रामपंचायत कागदपत्रि उपयोग करून यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार होत आहे विकासाच्या नावाखाली रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याची व रस्ते बांधकाम , मुरूम , रंगरंगोटी व अनेक योजना राबवताना जास्तीत जास्त मलिदा कसा खाता येईल याकडे सर्वात जास्त लक्ष देण्यात आले याबाबतच्या अनेक तक्रारी झाल्या परंतु वरिष्ठांनी अजून पर्यंत कोणतीही कार्यवाही न केल्याने शिरला परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे शिरला ग्रामपंचायत नागरिकांना कोणत्या प्रकारच्या सुख सुविधा न देता फक्त करवसली करून आपली खिसे भरण्याची काम होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये बोलली जात आहे