पातूर:- पातूर तालुक्यातील पांढूर्णा येथील 24 जानेवारी रोजी गावकऱ्यांना पिंपळडोळी, व पांढूर्णा ग्राम पंचायतीचा प्रथम ठराव घेवून कमान उभारली असता चांनी पोलिस स्टेशन चे ठाणेदार यांनी जातीवादी पना मुळे हेतुस्पुरस्पर पणाने कमान पडल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला व पोलिस अधीक्षक अकोला यांच्या कडे , पोलिस महांचालक मुम्बई, विषेश पोलिस महानिरीक्षक अमरावती यांचे कडे तक्रार केली व ठाणेदार यांचेवर तात्काळ बदली करून निलंबनाची कार्यवाही करुण व अनुसूचित जाती अन्तर्गत अट्रोसिटी दखल करण्याची मागणी केली मात्र अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्याने गावातली सिध्दार्थ सोनोने व समाधान सोनोने यांनी पोलिस अधीक्षक अकोला यांच्या कार्यालयासमोर 16 फेब्रुवारीला रोजी आत्महदहन करण्याचा इशारा दिला . व त्यांच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास सर्वशी जबाबदार पोलिस अधीक्षक अकोला राहतील अश्या प्रकची निवेदन पोलिस अधीक्षक अकोला व जिल्हा अधिकारी अकोला यांना दिली आहे