
अकोला जिल्हा होमगार्ड जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधिकक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासकीय अधिकारी.शेख शाहनवाज,केंद्रनायक राजेश शेळके यांच्या उपस्थितीत अकोला जिल्हा होमगार्ड्स कार्यालयात पुरुष होमगार्डचे आठ दिवसाचे उजळणी प्रशिक्षण शिबिर क्रमांक 4/10 या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.उजळणी प्रशिक्षण शिबिर दिनांक १९/७/०२४ ते २६/७/०२४ पर्यंत च्या कालावधीत अकोला जिल्हा होमगार्ड कार्यालयात घेण्यात आले.या शिबिराला अकोला, बाळापूर,अकोट,मुर्तीजापुर,
येथील होमगार्ड सैनिक सहभागी झाले होते.

शिबिराच्या तिसऱ्या दिवशी बुलढाणा जिल्ह्याचे माजी जिल्हा समादेश तथा सेवानिवृत्त प्राध्यापक माननीय श्री.जगदेवरावजी बाहेकर साहेब यांनी. उजळणी प्रशीक्षण शिबिराला रविवारी २१ जुलै रोजी योगायोग धावती भेट दिली.व शिबिरा दरम्यान होमगार्ड्सना मार्गदर्शन केले.

यावेळी अकोला जिल्हा होमगार्ड्स केंद्रनायक तथा शिबिर प्रमुख राजेश शेळके,पातुर तालुका समादेशक संगीता इंगळे,अकोट तालुका समादेशक सुरेश नाठे,पलटण नायक दीपक सूर्यवंशी,पलटण नायक प्रेम कुमार दामोदर पलटण नायक भिसेन यांच्यासह अकोला जिल्ह्यातील जळणी प्रशीक्षणार्थी होमगार्ड सैनिक उपस्थित होते.