सध्या शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची लागवड केली असून त्याकरिता विहीर, बोर व इतर साधनातून मोटर पंप द्वारे पाणी व्यवस्थापन करावे लागते परंतु विज वितरण कंपनीने आठवड्यातून तीन दिवस दिवसा विद्युत पुरवठा व इतर दिवशी रात्रीला केल्याने शेतकऱ्यांना अनेक समस्यांच्या समोर तोंड द्यावे लागत आहे याकरिता पातुर शिवसेनेच्या वतीने आमदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शहर प्रमुख निरंजन बंड, युवासेना उपजिल्हाप्रमुख सागर रामेकर यांच्या नेतृत्वात दोन डिसेंबर रोजी उपविभागीय वीज वितरण कंपनीवर आंदोलन करून शेतकऱ्यांना दिवसा विद्युत पुरवठा द्यावा याकरिता निवेदन सादर करण्यात आले यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी शहर प्रमुख – निरंजन बंड, युवासेना उपजिल्हा प्रमुख – सागर रामेकर, परसरामजी उंबरकार, छोटू भाऊ काळपांडे, अनील निमकंडे, सागर कढोने, कैलास बगाडे, दिपर देवकर, आनंद तायडे, अजय पाटील, सचीन गिरे, अंबादास देवकर, विष्णुभाउ खुरसडे, शंकर देशमुख, विनोद बोंबटकार, रवी भाऊ काकड गणेश पाटील विक्की पाटील, ज्ञानेश्वर पातुरे, रामेश्वर बेलुलकर, मनोज हानोरे, सुनील माऊली कर विशाल तेजवाल, बंटी हरणे, गणेश खरडे, संतोष भगत, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते
