अकोला : बाळापुर मतदारसंघातील उबाठा शिवसेना पक्षात राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनेतील कार्यकर्त्यांचा प्रवेशाचा जोर वाढला असून नुकताच पातुर येथील विविध सामाजिक संघटनेत कार्यरत असलेले पिंपळेश्वर संस्थांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
शिवसेना जिल्हा कार्यालयात विविध सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पक्षप्रवेशांचा छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पातुर येथील विविध सामाजिक संघटनेत कार्यरत असलेले पिंपळेश्वर संस्थांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

पिंपळेश्वर संस्थान पातूरचे अध्यक्ष गणेश बोंबटकर, सुनील माहुलिकर, संतोष हिरळकार यांच्या पुढाकाराने अतुल सातव, सागर सौंदळे, आकाश सातव, सागर माहुलीकर, पिंटू दिरलकार, बबलू ठाकरे, राहुल उमाळे, विक्की सातव, सचिन अंबुस्कर, पवन गोकर, वैभव घोडके, नितीन आढाऊ, हर्षल देशमुख, किशोर आलाट, विशाल निलावत, ईश्वर सुगंधी, मेजर पोहरे, गोलू गवई, संतोष लांडगे, देवा घोडके, उज्वल शेगोकार, छोटू ठाकरे, विशाल ठाकरे, सचिन बेलूरकर, विष्णू मते, संकेत चव्हाण, विक्की उमाळे, शिवा अंबुस्कर, सचिन आवटे, श्याम बोंबटकर, शेरू खंडारे, गौरव बंड आदिंसह शेकडो कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात एकजुटीने काम करण्याचा निर्धार या कार्यकर्त्यांनी केला आहे. यावेळी शहर प्रमुख निरंजन बंड , युवा सेना जिल्हा उपाध्यक्ष सागर रामेकर ,उप तालुकाप्रमुख अनिल निमखंडे सागर कढोणे , कैलास बगाडे,दीपक देवकर सह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते
