माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त सोपीनाथ संस्थान दिग्रस या ठिकाणी प्रकाश अवचार यांचा नुकताच सत्कार करण्यात आला सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले राज्यातील विविध प्रकारच्या दिव्यांगा करिता गेल्या वीस वर्षापासून सतत कार्यरत असलेले त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या लोक कलावंतांसाठी झटणारे प्रकाश अवचार यांचा नुकताच दिग्रस या ठिकाणी माननीय माननीय आमदार गोपीकिशन बाजोरिया त्याचप्रमाणे बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी आमदार बळीरामजी सिरस्कार त्याचप्रमाणे विविध पदाधिकारी उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कृष्णाजी अंधारे यांनी केले होते या कार्यक्रमात समाजामध्ये विविध घटकांसाठी उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचे सत्कार करण्यात आले त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये संपूर्ण कलावंतांसाठी त्याचप्रमाणे दिव्यांगांसाठी अविरत झटणारे प्रकाश अवचार सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कार प्राप्त असलेले यांचा सत्कार सन्माननीय आमदार गोपीकिशन बाजोरिया बाबासाहेब देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी त्यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह देण्यात आले प्रकाश अवचार यांच्यासोबत श्री गजानन पाटील वहाळा त्याचप्रमाणे श्रावण सोनवणे पवन गाडे तथा भीमराव उपरवट महिला आघाडीच्या लताताई मते पाटील या सुद्धा सदर कार्यक्रमाला सत्कार करतेवेळी उपस्थित होत्या
