आलेगाव दी.२१ प्रतिनिधी अयोध्या येथे श्रीराम प्रभू प्राणप्रतिष्ठा उत्सव देशभर साजरा होत असताना सदर उत्सव प्रत्येक गावामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेऊन हर्शोलासात पार पडावा या अनुषंगाने आलेगाव पोलीस चौकी मध्ये दी.२० रोजी शांतता समितीची बैठक पार पडली.या वेळी चांनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण यांनी उपस्थितांकडून श्रीराम प्रभू प्राणप्रतिष्ठा निमित्त गावातील मंदिरामध्ये होणाऱ्या कार्यक्रमाची माहिती मंदिर संचालका कडून घेतली.तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित ठेऊन सदर धार्मिक कार्यक्रम पार पाडावे असे आवाहन करून,सोशल मीडिया बाबत बोलताना सोशल मीडियावर जातीय तेढ निर्माण होणार नाही या बाबत दक्षता बाळगावी,तसेच दिवसेंदिवस मुली पळून जाण्याचे प्रकार वाढीस लागत आहेत, या गंभीर बाबीकडे जबाबदार व्यक्तींनी लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले. या वेळी ग्रा पं सरपंच गोपाल गणपतराव महल्ले,पोलीस पाटील देवणाथ धाईत,सामाजिक कार्यकर्ते सुलेमान भाई,अक्षय जैन,विजय बोचरे, अनिल जैन,राजेश काळपांडे,नारायण महल्ले,पांडुरंग गीऱ्हे,जब्बारखान, सै मुजीब, मयुर मुळे,अक्षय धाईत,मो.मुजीब,अमोल गीऱ्हे,गोविंद करपे, आदींसह पत्रकार मंडळी उपस्थित होते.तसेच कायदा सुव्यस्था अबाधित ठेवण्यासाठी चांनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण पी एस आय गणेश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये चांनी पोलिसांनी दी.२१ रोजी पथसंचलन केले.

अयोध्या श्रीराम प्रभू प्राणप्रतिष्ठा निमित्त आलेगाव येथे शांतता समितीची बैठक
-
Next
शतकांची प्रतीक्षा संपली आज पातुर शहर राममय झाले पातुर शहर एक ऐतिहासिक परंपरेचे प्रतीक पातूर शहरातील विविध संघटनांनी पातूर शहरात शतकांच्या प्रतीक्षेत असलेल्या अयोध्या येथील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या दिनी दीपावली साजरी केली पातुर शहरातील प्रत्येक घराघरांमध्ये दीप प्रज्वलन करून श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा उत्सव साजरा करण्यात आला यावेळी पातुर शहरातील ऐतिहासिक खडकेश्वर परिसरामध्ये असलेले श्रीरामांचे मंदिर पतदिव्यांनी व आकर्षक लाइटिंग ने सजवण्यात आले तर महाआरती पातुर शहरातील प्रत्येक मंदिर परिसरात करण्यात आल्या यावेळी प्रभू श्रीरामाचे व लक्ष्मण, सीता, रामभक्त हनुमान यांच्या भूमिका बाल कलाकार. श्री रवि हिरळकार, साई रवि हिरळाकार, बालिका श्रेजा गणेश निमकंडे, तर हनुमान यांच्या भूमिकेत निरज किरण कुमार निमकंडे या लहान चिमुकल्या मुलांनी सादर केल्या व आकर्षक ठरले व समंस्त पातुर शहरातील तपें हनुमान व्यायाम शाळा, सिदाजी महाराज व्यायाम शाळा, पिंपळेश्वर व्यायाम शाळा, महात्मा फुले भाजी बाजार समिती, जय भवानी व्यायाम शाळा तेलीपुरा, संभाजी ग्रुप, बजरंगी ग्रुप, नवयुवक मंडळ गुजरी लाईन, जय बजरंग फ्रेंड्स क्लब, हिंदुस्तानी फ्रेंड्स क्लब, हिंदू खाटीक महासंघ, छत्रपती शिवाजी महाराज पंच मंडळ, विर भगतसिंग मंडळ शनिवार पुरा, हिंदू सेना व्यायाम शाळा पाटील मंडळी, स्वराज मित्र मंडळ, कासार वेटाळ, संत श्री सिदाजी महाराज पंच मंडळ, कवळेश्वर भजन मंडळ, खडकेश्वर व्यायाम शाळा, बालाजी मंदिर पंच मंडळ, माऊली मित्र मंडळ गुरुवार पेठ, तुळजाभवानी संस्थान गुरुवार पेठ भंक्त परिवार , या सर्व संघटनांनी पताके, झेंडे, लायटिंगच्या रोषणाईने आपापले परिसर नयनरम्य भगव्या झेंड्याखाली सजवण्यात आले तर विविध संघटनांनी मोतीचूरचे लाडू, बूदी वाटप, मिठाई वाटप केली अशाप्रकारे पातुर शहरात अयोध्या येथील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेच्या दिनी दीपावली साजरी करण्यात आली