पातुर नगरपरिषद येथील कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरिता राजकीय संघटनेच्या माध्यमातून 29 ऑगस्ट पासून बेमुदत संप पुकारला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत नगरपरिषद नगरपंचायतीमधील सन 2005 नंतरचे अधिकारी व कर्मचारी यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही तसेच जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आलेली आहे.त्यामुळे दोन्ही कारणास्तव राज्य संवर्गातील तपास 3000 अधिकारी आणि स्थानिक आस्थापन वरील साठ हजार कर्मचारी संवर्गामध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे.अशा विविध मागणीसाठी राज्यस्तरीय संघटनेच्या वतीने शासनाची वारंवार पाठपुरावा करून शासनाने कोणतेही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आज पातुर नगरपरिषद येथील कर्मचार्यींनी संप पुकारला आहे या संपामुळे कामकाज विस्कळीत झाले आहे.संपामध्ये नगरपरिषदचे शंभर टक्के कर्मचारी यांनी सहभाग घेतला आहे.

oplus_2