पातुर तालुक्यातील चिंचखेड बोडखा परिसरातील मोहम्मद मेहताब यांच्या शेतावरील दिनांक चार एप्रिलच्या रात्री बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या गोऱ्यावर हल्ला करून त्याचे अर्धे अवयव फस्त केले. गेल्या अनेक दिवसापासून या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत या भागात या बिबट्याने अनेक शेतकऱ्यांना दर्शन दिल्याचे बोलले जाते. शेतकरी मोहम्मद मेहताब यांनी वनविभागात तक्रार दिली असून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी करीत आहेत या परिसरातील गोधन मालक या बिबट्यापासून चिंताग्रस्त असून या बिबट्याचा योग्य ते उपाय वनविभागाने करावा अशी मागणी शेतकरी वर्गाची आहे

{"remix_data":[],"source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}