पिंपळखुटा येथे अभिनव उपक्रम : ७८० रुग्णांना दिलासा
योगेश नागोलकार
राहेर : पातुर तालुक्यातील पिंपळखुटा येथे शंकरराव रामकृष्णराव कव्हळे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून इतर गोष्टीवर उधळ मादळ न करता रुग्णसेवेने जन्मदिवस साजरा करण्याचे ठरविले होते. संपूर्ण महाराष्ट्रभर शिबिर सेवेसाठी प्रसिद्ध असलेले गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाच्या मार्गदर्शनाखाली संदीप शंकरराव कव्हळे मित्रपरिवार व वीर भगतसिंग सेना व समस्त पिंपळखुटा ग्रामस्थ यांनी दि. ३१ ऑगस्ट रोजी संत तुळसाबाई संस्थान येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामुळे पिंपळखुटा परिसरात येणाऱ्या विविध गावातील गोरगरीब जनतेला एकाच ठिकाणी एकाच छता खाली उपचाराच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्याने दिलासा मिळाला आहे. यावेळी गोदावरी फाउंडेशनचे विविध आजारावर उपचार करणारे नामांकित डॉक्टरांचा चमू या भव्य शिबिरामध्ये उपस्थित होता. या शिबिरामध्ये परिसरातील एकूण ७८० रुग्णावर रक्त तपासणी करून स्वादुपिंड , छोट्या गाठी, मुळव्याध, भगंदर, पित्ताशय खडे, मूत्रपिंडाचे आजार,अशा विविध आजारावर उपचार करण्यात आले. गोदावरी फाउंडेशन जळगाव व आयोजकांचे परिसरातील ग्रामस्थ व रुग्णांकडून आभार व्यक्त करत कौतुक करण्यात आले आहे. शंकरराव रामकृष्ण कव्हळे. यांच्या हस्ते शिबिराची सांगता करून रुग्णसेवेने जन्मदिवस साजरा करण्यात आला होता.