प्रेमदास राठोड राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित

पातुर प्रतिनिधी :- संगीता इंगळे पातूर तालुक्यातील अति दुर्गम भागात असलेल्या सावरगांव येथील बाबासाहेब विद्यालय येथे मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले महाराष्ट्र शासन आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मा.श्री.प्रेमदास जानकिराम राठोड यांना नुकताच त्यांच्या जिवनातील शैक्षणिक योगदानाबद्दल राष्ट्रीय गौरव पुरस्कार शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब (कोकण विभाग) तसेच रेहाना शेख. (असिस्टंट कमिशनर पोलीस) राजभवन मुंबई यांच्या हस्ते प्राप्त झाला आहे.तसेच सिने कलाकार जयंत ओक साहेब साहित्यिकांनी कवी नितीन चंदनशिव सर वरील कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून होते.
पी.जे.राठोड यांचा जिवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी असून त्यांचे शैक्षणिक,सामाजिक,क्रीडा,कला,स्काऊट गाईड अशा विवीध क्षेत्रातील कामगीरी उल्लेखनिय असून त्यांचा स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक संस्था झरंडी अंतर्गत विवीध शाळांमध्ये त्यांचा ३१ वर्षाचा प्रदिर्घ शैक्षणिक प्रवास उल्लेखनीय आहे.
कलासाधना सामाजिक संस्था नवी मुंबई द्वारा ‘राष्ट्रीय गौरव पुरस्काराने मुंबई येथे संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यात राठोड यांना सन्मानित करण्यात आले आहे.
मुख्याध्यापक श्री.प्रेमदास राठोड यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेचे संस्थापक सचिव मा.श्री. रामसिंगजी जाधव,आई-वडील,राठोड कुटूंबिय,स्काउट व गाईड मित्र परीवार तसेच बा.ना.विद्यालय सावरगांव येथील सहकारी शिक्षक वृंदांना दिले आहे.