चान्नी पोलीस स्थानकात अंमलदार म्हणून 35 वर्ष सेवा बजावली
योगेश नागोलकार रोखठोक न्यूज
राहेर:-पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पोलीस अंमलदार महादेव मधुकराव देशमुख पिपंळखुटा याची जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी पोलीस उपनिरीक्षकपदी पदोन्नती केली आहे. महादेव मधुकरराव देशमुख हे 1991 मध्ये पोलीस सेवेत दाखल झाले होते. नंतर खात्याअंतर्गत पोलीस अंमलदार म्हणून त्यांनी 34 वर्ष सेवा बजावली २६ जानेवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांना पदोन्नती देण्यात आली. महादेव देशमुख यांनी चान्नी पोलीस स्टेशनला अंमलदार म्हणून पोलीस स्थानकात 35 वर्ष सेवा बजावली आहे. पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाल्याने त्यांचे पिंपळखुटा गावकऱ्यासह आजूबाजूच्या गावासह पोलीस बांधवाकडून अभिनंदन केले आहे.