डॉ. पंजाबराव देशमुख कृषीविद्यापीठ अकोला अंतर्गत श्रीमती सुमित्राबाई अंधारे कृषी महाविद्यालय शिर्ला अंधारे, ता. पातुर येथील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रेणुका नगर येथील श्री गजानन ऍग्रो दाल मिलला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध दाळींची रिफायनिंग कशी होते याबद्दल माहिती घेतली व या व्यवसायात एकूण उत्पादन आणि नफा किती होतो याबद्दल सुद्धा माहिती घेतली. दाल मिलला भेटी देणाऱ्यांमध्ये धिरज मुदगल, साक्षी नेवारे, अंकिता मून, शुभम थोराट, प्रियंका मेश्राम. मार्गदर्शन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम खरडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. शैलेश दवणे, कार्यक्रम अधिकारी प्रा. सागर भगत व विषय तज्ज्ञ प्रा. सोनल खवणे यांचे मार्गदर्शन लाभले.
