बाळापुर विधानसभा मतदारसंघाची प्रतिष्ठेची निवडणूक समजण्यात येत होती या निवडणुकीत संबंध महाराष्ट्राचे लक्ष लागले होते कोणत्याही परिस्थितीत आमदार नितीन देशमुख यांचा पराभव करण्याकरिता मोठ्या शिथापीने कूटनीती आखून मोठी व्युवरचना आखण्यात आली होती .परंतु या सर्व संकटांना सामना करीत नितीन देशमुख यांनी विरोधकांना चारी मुंड्या चित करत दणदणीत विजय प्राप्त केला. यादरम्यान विरोधाकाचे काही चिलमतोंडे हे नेहमी नितीन देशमुख हे तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार असल्याचे भासवित होते. आज त्यांना ह्या गप्पा तोंडखशी पडल्याने ते चिंतेत आहेत. या निवडणुकीत नितीन देशमुख यांना सर्व समाज व धर्मियांनी मदत केल्याचे चित्र दिसून आले त्यांनी केलेल्या पाच वर्षात विकासाचा पाढा आणि प्रत्येक गावात भेटीगुटी घेत असल्याने त्यांचा संपर्क दांडगा होता. त्यांच्या या विजयाने संपूर्ण बाळापुर मतदार संघात आनंदाचे व चैतन्याचे वातावरण असल्याचे दिसून येते
