विशेष प्रतिनिधी- मराठा
आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर
बीडमध्ये मोठ्या प्रमाणात
हिंसाचार घडला होता. या
घटनेला १ महिना पूर्ण होत
असून यात आतापर्यंत २६२
जणांना पोलिसांनी अटक केली
आहे. तपासात बीडमध्ये
जाळपोळ, तोडफोड करणारे
एकूण १० गट असल्याचं
आढळले. त्यातील ६ गटाचे
प्रमुख पकडले गेलेत. इतर ४
गटांचे प्रमुख पसार असून त्यांचा
शोध सुरू आहे. गटातील इतर
सदस्यांना अटक केली आहे.
महत्त्वाच्या आरोपींपैकी पप्पू शिंदे
यालाही बेड्या ठोकल्या आहेत.
त्याची सध्या चौकशी सुरू आहे
अशी माहिती पोलीस अधीक्षक
नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.
