पातुर येथे शिवसेना पक्षाच्या आढावा बैठकीचे आयोजन गाडगे नगर येथील पटांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार नितीन देशमुख हे होते तर कार्यक्रमाला शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते आढावा बैठकीला मार्गदर्शन करताना नितीन देशमुख यांनी आज पर्यंत या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही शिवसेनेमुळे होती आज शिवसेनेचा जनसंपर्क, विकासाची कामे प्रचंड प्रमाणात बाळापुर मतदारसंघात झाल्याने भाजपाने या विकासाची भीती निर्माण झाली आहे भाजपाने प्रत्येक वेळी शिवसेना संपवीण्याचा कुटिल डाव केला. येणाऱ्या लोकसभेमध्ये आघाडीचा उमेदवार कशाप्रमाणे निवडून येईल याचे गणित या मेळाव्यात आमदार निधी देशमुख यांनी मांडले.

बाळापूर मतदारसंघात लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 40 हजाराच्या वर लिड घेऊन आघाडीचा उमेदवार विजयी होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला यादरम्यान यावेळी आमदार देशमुख यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना व नागरिकांना भावनिक आवाहन केले तुमचे येणाऱ्या पंधरा दिवस या निवडणुकीत द्यावे उर्वरित वर्षभर मी तुमच्या सेवेत हजर राहतो असे आवाहन केले. या बैठकीला उपजिल्हाप्रमुख योगेश्वर वानखडे, तालुका प्रमुख रवींद्र मुतर्डकर, शहर प्रमुख निरंजन बंड. परसराम उंबरकर, देवलाल डाखोरे, अकोला शहर प्रमुख राहुलजी कराळे, काँग्रेसचे अतुल अमानकर जिल्हा परिषदेच्या पंजाबराव पवार, संतोष सरदार, गोपाळ ढोरे, रामदासजी धोत्रे,. सुनील गाडगे, झळपे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर रामेकर, अरुण कचाले सुनील गाडगे गजानन शिंदे जनार्दन डाखोरे संजू भाऊ बंड संजय वाडेकर किशोर खडके. सह पातुर तालुक्यातील प्रत्येक गावातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते