अकोला जिल्हा लोकसभा मतदारसंघात लोकसभेची निवडणूक अंतिम टप्प्यात येत असताना अकोला जिल्ह्यातील तथाकथित माळी समाजाच्या तीन टप्पर नेत्यांनी समाजाची बैठक न घेता आपापल्या सोयीने उमेदवारांना पाठिंबा समर्थक देऊन माळी समाजाचा मत न ऐकता मताची चिरफाड केल्याने माळी समाजात या नेत्या विषयी प्रचंड रोष निर्माण होत आहे. आपल्या आपल्या पक्षात आपल्या समाजाचे वर्चस्व दाखवून मताची विभागणी करण्याचा प्रयत्न ही काही समाजकंटक करीत आहेत परंतु या निर्णयाला सर्वसाधारण समाजाचे मतदारना यांचे षडयंत्र माहित पडल्याने हे सर्व नेते तोंड घशी पडत आहेत. माळी समाजाचे अकोला जिल्ह्यात मोठे प्रस्थ असून हा समाज ज्या उमेदवाराला मतदान करील तो उमेदवार निवडून येण्याची क्षमता ठेवतो परंतु माळी समाजाच्या नेत्यांनी ओबीसी आरक्षण विसरून आपल्या सोयीनुसार आपलं राजकीय भवितव्य जोपासण्याकरिता आपापल्या परीने निर्णय घेऊन आपापल्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा देऊन स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा केवलवाणि प्रयत्न केला आहे. सोशल मीडियावर वेगवेगळे मत प्रगट करून हे माळी समाजाचे तथाकथित नेते आपली बाजू भक्कम करण्याचा प्रयत्न करतात याबाबत जिल्हाभर अनेक माळी समाजाच्या बुद्धिवान नेत्यांची चर्चा केली असता त्यांनी या भूमिकेची नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हाभरातून माळी समाजाच्या प्रत्येक गावातील प्रतिष्ठित व्यक्तींना बोलावून चर्चा करून निर्णय घेण्याचा कोणत्याही प्रयत्न करण्यात आला नाही यामुळे माळी समाजाची अकोला लोकसभा मतदारसंघात एकी नसल्याचे दिसून येते व समाज बदनाम होतो हे या नेत्यांना माहित नाही का
