स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी साकारले महाभारत महानाट्य

पातूर प्रतिनिधी : शिक्षण म्हणजे केवळ शालेय अभ्यासक्रम पूर्ण करणे नाही तर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देत त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हेच खरे शिक्षण आहे. यानुसार पातुरची किड्स पॅराडाईज स्कूल ही विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणारी शाळा आहे असे प्रतिपादन शिक्षक आमदार किरण कुमार सरनाईक यांनी केले.
पातुर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचे स्नेहसंमेलन थाटात पार पडले या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन शिक्षक आमदार किरण कुमार सरनाईक यांच्या हस्ते पार पडले यावेळी उद्घाटन पर भाषणात ते बोलत होते.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे हे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून

जेष्ठ पत्रकार, संपादक ऍड. सुधाकर खुमकर, सरस्वतीआई गाडगे,पातुरचे तहसीलदार डॉ. राहुल वानखडे,महापारेषण अकोलाचे कार्यकारी अभियंता विनोद हंबर्डे, तांत्रिक कामगार युनियन 5059 चे केंद्रीय सरचिटणीस प्रभाकर लहाने, समाजसेविका सोनालीताई लहाने,झी 24 तास चे ज्येष्ठ पत्रकार जयेश जगड, आज तक चे अमरावती विभागीय प्रतिनिधी धनंजय साबळे, महापारेषण पातुर चे उपकार्यकारी अभियंता मंगेश काळे,ब्लॉसम किड्स स्कूलचे संचालक प्रा.सुधीर सरदार,स.ल.शिंदे विद्यालयाचे उपाध्यक्ष डॉ. अनिल निखाडे,सचिव मोहन बदरखे,जेष्ठ पत्रकार अब्दुल कुद्दूस सर,सैय्यद साजिद सर, किड्स पॅरेडाइज स्कूलचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे,कार्यकारी संचालिका सौ ज्योत्स्ना गाडगे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपाल गाडगे यानी केले.त्यांनतर आ. किरण सरनाईक,डॉ. गजानन नारे,ऍड.सुधाकर खुमकर,विनोद हंबर्डे आदीं मान्यवरानी विचार व्यक्त केले.यानंतर शाळेने प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. “माझी शाळा सुंदर शाळा” या उपक्रमात प्रभात किड्स स्कूल महाराष्ट्रातून प्रथम आल्याबद्दल डॉ. गजानन नारे यांचा व पातूर तालुक्यातून किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल प्रथम आल्याबद्दल आमदार किरण सरनाईक यानी गोपाल गाडगे व सौ ज्योत्स्ना गाडगे यांचा सत्कार केला. या सोहळ्यात पातूरच्या साने गुरुजी बहुद्देशीय मंडळाला केंद्र सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाल्याबद्दल मंडळाचे अध्यक्ष विशाल राखोंडे व पल्लवी राखोडे तसेच महाराष्ट्र केसरीसाठी निवड झालेले अक्षय तायडे, अजय हाडके, विशाल बावसकर आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन श्रावणी गिऱ्हे, अश्विनी टाले यानी केले. या उदघाट्न सत्रानंतर सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यामध्ये विद्यार्थ्यांनी नृत्य नाटिकेचे उत्कृष्ट सादरीकरण केले. यावेळी चारशे विद्यार्थी सहभागी असलेले महाभारत हे महानाट्य सादर करीत उत्कृष्ट नाट्यकलाकृती पाहण्याचा अनुभव पालकांनी घेतला.
दहावीच्या विद्यार्थिनींनी काढलेली पोस्टर रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नितु ढोणे, नयना हाडके, नरेंद्र बोरकर, रविकिरण अवचार, अविनाश पाटील, संकल्प व्यवहारे, पंकज अवचार, बजरंग भुजबटराव, हरिष सौंदळे, प्रतीक्षा भारसाकळे, स्वाती वाळोकार, प्रियंका चव्हाण, पूजा खंडारे, प्रचाली थोराईत, माधुरी टाले, शितल गुजर, ऋतुजा अवचार, नेहा उपर्वट, मोनाली तायडे, रुपाली पोहरे, शुभम पोहरे, मधुकर बोडदे, सुनिल पाटील, संतोष लासणकर,गणेश करंगळे,यांच्यासह आजी माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
