पातुर नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या परिसरामध्ये सर्वत्र घाण असून याबाबतने नगरपरिषद ने लक्ष द्यावे याकरिता शिवसेना वतीने माननीय आमदार नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर प्रमुख निरंजन बंड व युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर रामेकर यांच्या नेतृत्वात दिनांक 2 डिसेंबर रोजी निवेदन देण्यात आले सार्वजनिक शौचालय व परिसर स्वच्छतेबाबत पातूर नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. पातूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहाजवळ बांधण्यात आलेले शौचालय व परिसरातील अस्वच्छता स्वच्छ करणे.यासाठी पातूर शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पातूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, या परिसरात सर्वत्र घाण पसरली आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांना या संकुलात बांधलेल्या शौचालयात जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. येथे साफसफाई होत नाही याकरिता शिवसेनेचे पदाधिकारी यांनी यावेळी निवेदन सादर केलेयावेळी शिवसेनेचे पदाधिकारी शहर प्रमुख – निरंजन बंड, युवासेना उपजिल्हा प्रमुख – सागर रामेकर,पररारामजी उंबरकार, छोटू भाऊ काळपांडे, अनील निमकंडे, सागर कढोने, कैलास बगाडे, दिपर देवकर, आनंद तायडे, अजय पाटील, सचीन गिरे, अंबादास देवकर, विष्णुभाउ खुरसडे, शंकर देशमुख, विनोद बोंबटकार, रवी भाऊ काकड गणेश पाटील विक्की पाटील, ज्ञानेश्वर पातुरे, रामेश्वर बेलुलकर, मनोज हानोरे, सुनील माऊलीकर विशाल तेजवाल, बंटी हरणे, गणेश खरडे, संतोष भगत, इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते
