राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अकोला जिल्हा तर्फे आज जनतेच्या मनातील मुख्यमंत्री माननीय ना.श्री.अजित पवार हेच व्हावेत यासाठी अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वर दुग्धाभिषेक येथे व पूजा हवन संपन्न…..
अकोला जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री मा.ना.अजित दादा पवार हेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आज दिनांक 2 डिसेंबर २०२४ रोजी अकोल्याचे आराध्य दैवत श्री राज राजेश्वर येथे दुग्ध अभिषेक व पूजा करण्यात आली.यावेळी जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.माननीय अजितदादांनी आजपर्यंत महाराष्ट्राचे दहा अर्थसंकल्प सादर करून महाराष्ट्रात इतिहास घडवला तसेच आतापर्यंत राज्यामध्ये पाच ते सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून हे पद त्यांनी भूषवले. राज्यापेक्षा प्रकारचा मोठा नेता म्हणून सध्या अजितदादा पवार हे एकमेव नाव असल्यामुळे तेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी शेतमजूर या सर्वांची इच्छा आहे. म्हणूनच आज अकोल्याच्या आराध्य दैवत राजेश्वर मंदिरामध्ये जलाभिषेक व रुग्दाभिषेक करून राजराजेश्वर साकडे घालण्यात आला आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी महिला पदाधिकारी ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर सर्व घटकातील लोक या निमित्त एकत्र आले होते.
यावेळी कृष्णा भाऊ अंधारे यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्ह्यातील राष्ट्रवादी राष्ट्रवादी होती…
यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी युवक आघाडी विद्यार्थी आघाडी वैद्यकीय आघाडी सेवा दल यांच्यासह विविध आघाड्यांचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते
