हर्षल वानखडे प्रथम तर श्रुती तायडे दुसरी
पातूर : येथिल किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला असून हर्षल वानखडे याने ९२.२० टक्के घेऊन शाळेतून प्रथम तर श्रुती तायडे हिने ८९ टक्के मिळवून द्वितीय व सिद्धांत वानखडे याने ८८ टक्के मिळवून तिसरा येण्याचा बहुमान मिळवला आहे.गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे व कार्यकारी संचालिका सौ.ज्योत्स्ना गाडगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे,शिक्षक नरेंद्र बोरकर,हरिष सौंदळे प्रामुख्याने उपस्थित होते.महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षेत किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली. यामध्ये हर्षल वानखडे 92.20टक्के,श्रुती तायडे 89टक्के, सिद्धांत वानखडे 88टक्के पूर्व बंड 86टक्के,अश्विन निमकंडे 84.60टक्के,हरीश घुगे 83.60टक्के चक्रधर भगत 83.20टक्के कल्याणी हिरळकार 83टक्के समृद्धी ढाकोलकर 82.20टक्के,प्रेरणा कांबळे 81.40टक्के, आस्था राऊत 80 .40टक्के,अनुष्का घुगे 79.80टक्के, यश गवई 78.20टक्के,विधी बंड 77.80टक्के,सय्यद शाहिद 77.60टक्के, वेदांत ढाकोलकर 77.20टक्के,शिवम गिऱ्हे 76.40टक्के,आदित्य माळी 76.40टक्के,कुंजल राठोड 74टक्के, मोहंमद माज 73.80टक्के,अनिकेत घुगे 73.20टक्के,मोहम्मद मोजेबा 69.80 टक्के, प्रफुल फुलारी 68.40 टक्के,मोहम्मद आयशा 62 टक्के आदी विद्यार्थ्यांनी गुण मिळवून यश संपादन केले.