तेल्हारा दि. २३ (ता.प्र.) तरुण पिढी भारताचे भविष्य आहे.सन २०४७ पर्यंत भारताला विकसित व संपन्नतेकडे नेऊन नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासाठी, देशाने भावितव्य ठरविण्यासाठी विकासित भारताच्या यज्ञात अनुप धोत्रे सारख्या तरुणाला अकोला लोकसभेची उमेदवारी भाजपाने दिली एक टर्म त्यांना लोकसभेत पाठवा.चेहरा मोहरा बदलेल,संधीचे सोने करेल. विजयाचा महत्वाचा घटक बुखप्रमुखांची टीम आहे.केंद्र व राज्य शासनाने केलेल्या विकासकामाचा लेखाजोखा सामान्य मतदारांपर्यंत पोहचवा,घरोघरी संपर्क व संवाद साधा.असे प्रतिपादन तेल्हारा येथे लोकसभा संघटनात्मक बैठकीत शुक्रवारी २२ मार्च रोजी आमदार संजय कुटे यांनी तेल्हारा येथे केले.तेल्हारा येथील माहेश्वरी भवनात दि. २२ मार्च रोजी भाजपा,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस,रिपाई आठवले गट, रिपाई कवाडे (गट) यांच्या पदाधिकारी व तालुका व शहर कार्यकर्त्यांची संयुक्त संघटनात्मक बैठक आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या अध्यक्षतेखाली,आमदार संजय कुटे,प्रदेश सरचिटणीस आम,रणधीर सावरकर,लोकसभा उमेदवार अनुप धोत्रे,जिल्हा भाजपाध्यक्ष किशोर मांगटे पाटील,विजय अग्रवाल, विधानसभा प्रमुख राजेश रावनकर,तालुकाध्यक्ष गजानन उंबरकार,विधानसभा विस्तारक संजय शर्मा,शहराध्यक्ष महेंद्र गोययका,केशवराव ताथोड,उमेश पवार,शिवसेना तालुकाप्रमुख प्रवीण वैष्णव,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष कैलास ठोकणे, शहराध्यक्ष संतोष छांगाणी, शेतकरी पॅनलचे राजेश खारोडे,रिपाई आठवले गट चे भारत पोहरकार,श्रीकृष्ण मोरखडे,स्मिताताई राजनकर,जयश्रीताई पुंडकर,अनिल पोहने, कल्पनाताई पोहने,आरती ताई गायकवाड,सुनिताताई बगाडे,वंदनाताई आमाले, सुलभाताई दुतोंडे,श्रीकृष्ण मोरखडे,डॉ.बाबुराव शेळके,दिपक पोहने शेरु पंचगव्हाणकर
यांच्या प्रमुख उपस्थितीच संपन्न झाली.मुस्लीम बांधवांसाठी, नागपूरच्या दिक्षाभूमीसाठी, मुंबईच्या चैत्यभूमीसाठी सरकारने केलेल्या कामाचा उल्लेख करीत आ.कुटे यांनी देशावर पहिला अधिकार गरिबांचा आहे ही नरेंद्र मोदींची धारणा होती गरिबीत कोणी खितपत पडणार नाही हीच विकसीत भारताची संकल्पना असल्याचे, लोकांमध्ये उत्साह असल्याचे व आता लोकसभा निडणूक प्रचार कार्याला लागा, असे कुटे यांनी सांगितले प्रारंभी मंचावरील मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवराय,क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले,भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर,एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे प्रतिमेचे पूजन व हारार्पण करण्यात आले. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पहाराने स्वागत केले.तर अल्पसंख्यांक मुस्लीम बांधवांच्या वतीने मोठ्या हाराने लोकसभा उमेदवार अनुप धोत्रे यांचे जंगी स्वागत करण्यात आले.संघटनात्मक बैठकीवेळी अनेकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला वंचित बहुजन आघाडीचे माजी तालुकाध्यक्ष तथा माजी सरपंच संदिप इंगळे, माजी ग्रामपंचायत सदस्य रविंद्र वाकोडे,तंटामुक्ती अध्यक्ष वारीसखान पठाण,तुदगावचे भूषण देशमुख,विशाल मधुकर अढाऊ,शंतनू उपाध्ये,अडगावचे शेख जमीर शेख जाबीर यांचा समावेश आहे.नव्याने भाजपात प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ व भाजपचा गमच्छा देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आम.प्रकाश भारसाकळे,आ.रणधीर सावरकर, विजय अग्रवाल,किशोर मांगटे इत्यादींनी संबोधीत केले. सुत्रसंचालन डॉ.बाबुराव शेळके यांनी केले तर आभार सरचिटणीस रवि गाडोदिया यांनी मानले यावेळी भाजपा बुथ प्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, विधानसभा सुपर वॉरियर्स,महिला आघाडी,महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते, विविध आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
