महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून शिवसेनेचे एकनाथ शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार यांनी शपथ घेतली. अजित पवार हे पुन्हा एकदा राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीच्या वतीने झाल्याबद्दल पातूर तालुक्यात जल्लोष करण्यात आला. यावेळी कृष्णा अंधारे यांच्या नेतृत्वात जुने बस स्थानक चौकात आतषबाजी करीत पेढे वाटून जल्लोष करण्यात आला.अजित पवार यांनी सातव्यांदा राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन केले. यामुळे कृष्णा अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली जल्लोष करून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी कृष्णा अंधारे, अशोक मेतकर, शहर अध्यक्ष बब्बू डॉन,जिल्हाध्यक्ष अल्पसंख्यांका सेठ नइम खान, माजी नगरसेवक औ एजाज भाई, अन्सारभाई, रामा अमानकर, अजय पानवाले यांच्यासह बहुसंख्य राष्ट्री काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
