पातूर येथे सत्यपाल महाराज यांचे राष्ट्रीय किर्तन ६ मे ला.
महाराष्ट्र माळी युवक संघटना व किड्स पॅराडाईज स्कूलचा पुढाकार
पातूर : महाराष्ट्र माळी युवक संघटनेचेतर्फे यावर्षी सत्यशोधक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांना सत्यशोधक पुरस्कार जाहीर झाला आहे.पातूर येथे दि. ६ मे रोजी पार पडणाऱ्या एका दिमाखदार सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
पातूर येथिल श्री.सिदाजी महाराज मंगल कार्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर सत्यपाल महाराज यांचे राष्ट्रीय किर्तन होणार आहे. महाराष्ट्र माळी युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा काँग्रेस नेते प्रकाश तायडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या
या सोहळ्यामध्ये आमदार संजय खोडके,आमदार अमित झणक, शिक्षक आमदार किरणराव सरनाईक,आमदार नितीनबाप्पू देशमुख,आमदार साजिदखान पठाण आदी मान्यवरांचा सत्कार यावेळी करण्यात येणार आहे.तर कार्यक्रमाला स्वागतध्यक्ष म्हणून वंचितचे युवा नेते रितेश फुलारी तर प्रमुख अतिथी म्हमून किड्स पॅराडाईज स्कूलचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे,तहसीलदार राहुल वानखडे, ठाणेदार हनुमंत डोपेवाड,समता परिषदेचे नेते गजानन बारतासे, प्रा.विलास राऊत,दिलीप निमंकडे,गुरुदेव सेवाश्रमचे विश्वस्त संजय पाटील,आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
महाराष्ट्र माळी युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बारतासे, महासचिव जीवन ढोणे,सुनील पाटील,पातूर शहर अध्यक्ष डिगांबर फुलारी,पंकज वालोकर आदीं सह महाराष्ट्र माळी युवक संघटने तर्फे करण्यात आले आहे.