पोलीस स्टेशन चान्नी हद्दीत आलेगाव, चतारी येथे सुरू असलेल्या जुगारावर स्थानीक गुन्हे शाखा कडून कार्यवाहीत एकुण १० ईसमां विरूध्द ०३ गुन्हे नोंद करून १५,७५०/-रू चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आज दिनांक १७/१२/२०२४ रोजी स्थानीक गुन्हे शाखा, अकोला येथील पथक हे पो.नि श्री शंकर शेळके सा. यांचे मार्गदर्शनाखाली बाळापूर उपविभागात अवैध धंद्यावर ग्राम आलेगाव आणि ग्राम चतारी गावात जुगाराच्या अड्ड्यावर पथक प्रमुख श्री. सपोनि विजय चव्हाण त्याचे पथकातील अमंलदार यांनी ग्राम आलेगाव येथे दोन ठिकाणी तर ग्राम चतारी येथे अवैध जुगारावर धाडी टाकुन ग्राम आलेगाव येथे १) अन्सार खाँ जाहेद खॉ वय ४२ वर्ष रा.मोमीन पुरा आलेगाव २) अनिल मारोती लोखंडे वय ५१ वर्ष रा. ग्राम जांब ३) विजय भगवान ठोके वय ५५ वर्ष रा. गोळेगाव ४) गुलाबराव साहेबराव तेलगोटे वय ७२ वर्ष रा. बुध्दपुरा आलेगाव ५) जुबेर खान फिरोज खान वय २४ वर्ष रा. मोमीन पूरा आलेगाव ६) वसिम खान जाहीद खान वय २८ वर्ष रा. मोमीनपूरा आलेगाव ७) मोहम्मंद जकी मोहम्मंद ईसाब वय ५४ वर्ष रा. सरकारी दवाखान्याजवळ ग्राम आलेगाव ह.मु मेहबुब कॉलणी झिरा हैद्राबाद ८) दिपक तुळशिराम श्रीनाथ वय ३८ वर्ष रा.भोईपुरा आलेगाव ९) रामदास विष्णू इंगळे वय ५६ वर्ष रा. बौध्दपुरा आलेगाव असे मिळूण आले तसेच ग्राम चतारी येथे १०) शत्रुघ्न उत्तर सदार वय ५२ वर्ष रा. ग्राम चतारी यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून जुगार साहीत्य आणि नगदी एकुण १५,७५०/-रू असा जप्त करून सर्व आरोपी विरूध्द पो. स्टे चान्नी येथे गुन्हो नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही मा. पोलीस अधीक्षक अकोला श्री. बच्चन सिंह साहेब, अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे साहेब, पो.नि श्री. शंकर शेळके स्थागुशा अकोला, यांचे मार्गदर्शनात सपोनि. श्री. विजय चव्हाण, पो. अंमलदार सुलतान पठाण, अविनाश पाचपोर, विशाल मोरे, खुशाल नेमाडे, वसीमोद्दीन शेख, भिमराव दिपके, अशोक सोनोने, मोहम्मंद अमीर तसेच चालक मनिष ठाकरे यांनी केली आहे.
