सरसकट कर्ज माफी द्यावी.. शेतकरी संघटनेचे पूर्णाजी खोडके यांची मागणी..
अकोला प्रतिनिधी
अकोला: राज्यात विधानसभा निवडणुकीच्या काळात आमची सत्ता आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार, अशा प्रकारचे आश्वासन महायुतीच्या नेत्यांनी दिले होते. हे आश्वासन आता सरसकट कर्ज माफ करून पूर्ण करतील काय, अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली आहे. सततचा निसर्गाचा लहरीपणा, बी-बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशक यांचे वाढत चाललेले भाव, तसेच खर्चाच्या तुलनेत शेतमालाला मिळत असलेला कमी भाव, यामुळे शेतकरी खाजगी सावकार व बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्जबाजारी झाले आहेत. शेतात उत्पादन कमी झाल्याने सदर कर्जाची परतफेड करता आली आही स्हणून विदर्भातील शेतकरी निवडणुकीच्या काळात आम्हाला सत्ता मिळाल्यास आम्ही शेतकऱ्यांची कर्ज माफ करू, अशा प्रकारचा जाहीरनामा व आश्वासने महायुतीच्या नेतेमंडळी यांनी दिली होती. जनतेने सुद्धा त्यांना भरभरून मते देत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा करून दिला. त्यामुळे विदर्भातील जिल्ह्यातील विविध गावातील शेतकऱ्यांना शासनाने सरसकट कर्ज माफ करण्याची प्रतीक्षा लागली आहे… शासनाने शेतकरी हितासाठी कर्जमाफी जर केली नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकहा वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाने लाडकी बहीण योजनेप्रमाणे महायुतीचे सरकार शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफ करू शकेल, अशा प्रकारच्या आशा शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाल्या आहेत. शासनाने सरकार स्थापन झाल्यानंतर तत्काळ शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, अशा प्रकारांची मागणी रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष पुर्णाजी खोडके यांनी केली आहे…