पातूर : अकोला जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अकोलाचा अतिरिक्त प्रभार मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी यांच्या पाच जुलै रोजीच्या आदेशानंतर सोपवण्यात आला.
शिक्षण क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवणाऱ्या अकोला जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर या अकोला जिल्हा परिषद मध्ये रुजू झाल्यापासून शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून तसेच कृतिशील शिक्षणावर भर देऊन जिल्ह्यात शिक्षण क्षेत्राला नवसंजीवनी मिळऊन दिली आहे. त्यांच्या या कृतीशील उपक्रमामुळे शिक्षणाच्या अनेक क्षेत्रात त्यांनी अकोला जिल्ह्याचे नाव महाराष्ट्रात गाजवले आहे.
डॉक्टर सुचिता पाटेकर ह्या शिक्षण व कायदा क्षेत्रातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व मितभाषी प्रगतिशील तत्त्वनिष्ठ असून इतरांच्या चांगल्या कार्याची दखल घेणाऱ्या तसेच शैक्षणिक विचार धारेशी ध्येयवेढ व्यक्तिमत्व असून त्यांच्या या कार्याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्रीमती वैष्णवी बी. यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन पदी नियुक्ती केली. ही इतीहासातील पहिलीच वेळ आहे एक शिक्षणाधिकारी महिला या पदावर नियुक्त झाल्या त्यांच्या या नियुक्तीमुळे शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वांसाठी हा एक सुखद धक्का मिळाला. त्यांच्या नियुक्तीमुळे अकोला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ तसेच पातुर तालुका विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉक्टर रवींद्र भास्कर सह अकोला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे मुरलीधर थोरात, देवानंद मुसळे, सुनील वावगे,प्राचार्य तिवारी सर, श्री धर्मे सर, श्रीकृष्ण शेगोकार , शशिकांत बांगर, विश्वास जढाळ,सौ.आशा भास्कर यांची उपस्थिती होती.
