पातुर येथील जुने बस स्थानक लगत असलेल्या वन विभागाच्या कार्यालया मधील निंबाचे महाकाय वृक्ष आज दिनांक 16 डिसेंबर रोजी दुपारी अचानक कोसळल्याने एकच गोंधळ झाला. पातुर वाशिम महामार्गावर वन विभागात एक जुने महाकाय निंबाचे झाड होते ते आज अचानक कोसळल्याने दोन्हीकडची वाहतूक ही खोळंबली होती . हे झाड कोसळण्याच्या अगोदरच काही शाळकरी विद्यार्थी येथून जात होते या ठिकाणी नेहमी वर्दळ असते परंतु या घटनेमध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही या घटनेमध्ये या झाडाच्या खाली उभी असलेली चार चाकी वाहनाचा पूर्णता चुराडा झाला. घटनेनंतर पातुर पोलिसांनी ताबडतोब या महाकाय वृक्षाची कटाई करून विल्हेवाट लावली व वाहतूक सुरळीत केली.
