पातुर.
शाहबाबू एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित शहाबाबू उर्दू प्राइमरी, हायस्कूल व ज्युनियर कॉलेज पातुर येथे शालेय खेळ व स्पर्धा बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री सैय्यद बुऱ्हान यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री साजिद खान पठाण हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व शाळेने विविध क्षेत्रात घेतलेली गरुड झेप राही सरांनी मांडली. शाळेने आयोजित केलेल्या शालेय व आंतरशालेय खेळ व स्पर्धेमध्ये शाळा व शाळेबाहेरील जवळपास ७५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाला विशेष उपस्थितीत मा श्री निखिलेश दिवेकर(माजी उप महापौर अकोला), मा श्री संग्राम गावंड, श्री जावेद अली(सचिव खेळ असो.), श्री भरत डीक्कर सर(जि.संयो.व्ही सी.ए) श्री विन्सेट आमेर, संग्राम राजुरकर (युवा उद्यमी), मो.इरफान कॉन्सलर अकोला म न पा ,वरिष्ठ पत्रकार उमेश भाऊ देशमुख,छोटू भाऊ काळपांडे,सतीश सरोदे, अ.कुद्दुस शेख, तालुका होमगार्ड समन्वयक संगीत ताई इंगळे , निखिल इंगळे, किरण कुमार निमकंडे,नातिक शेख
श्री सै. सरफराजुद्दीन यांनी दर्शविली. सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी मा.आमदार श्री साजिद खान पठाण यांनी जीवनात खेळ व इच्छाशक्ती असेल तर आकाश ठेंगणे कसे करता येते व भविष्य उज्वल कसे घडविता येते विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी श्री दिवेकर, संग्राम गावंडे, हरणीत सिंग यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना संबोधित केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सैय्यद इसहाक राही सरांनी खेळ व स्पर्धेच्या माध्यमातून देश व आपले जीवन कसे घडविता येते याचे गुरु मंत्र विद्यार्थ्यांनादिले.यावेळी विद्यालयचे सर्व शिक्षक,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन विद्यर्थिनींनी केले तर आभार प्रदर्शन अहेसान उर रहेमान सर यांनी केले.
कार्यक्रमला यशस्वी करण्यासाठी सर्वच उपक्रम प्रभारींनी परिश्रम घेतले.