पातूर प्रतिनिधी :-येथे तब्बल ३७ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर,म्हणजेच १९८८ नंतर प्रथमच ११ व १२ मे २०२५ रोजी ६२ वे अखिल भारतीय अंकुर मराठी साहित्य संमेलन भव्य स्वरूपात संपन्न होणार आहे. हे संमेलन संत साहित्यनगरी, स्वर्गीय नामदेव रावजी राखोंडे साहित्य नगरी पातूर येथे आयोजित करण्यात आले आहे.या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक श्री.तुळशीरामजी बोबडे असतील.उदघाटन सोहळ्याचे उदघाटक म्हणून प्रा.वसंत पुरके (माजी शिक्षणमंत्री व अकोला जिल्ह्याचे माजी पालकमंत्री) उपस्थित राहणार आहेत.स्वागताध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक व जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री नारायणराव अंधारे यांची निवड झाली आहे.तर प्रा.डॉ.साधना निकम,साहित्यिक श्री नितीन देशमुख,आमदार बाळापूर तथा शिवसेना उपनेते
श्री हिम्मतराव ढाळे,केंद्रीय अध्यक्ष,अंकुर साहित्य संघ हर्षवर्धनदेशमुख,अध्यक्ष,शिवाजी शिक्षण संस्था,अमरावती
डॉ.संतोष हुशे पूर्व संमेलन उद्घाटक तथा प्रसिद्ध उद्योजक सौ.वैशाली निकम, जिल्हाध्यक्षा,भाजपा महिला आघाडी,अकोला डॉ.राहुल वानखडे,तहसीलदार,पातुर
हनुमंत डोपेवाड,ठाणेदार, पो.स्टे.पातुर डॉ.किरण खंडारे,प्राचार्य,डॉ.एच.एन.सिन्हा महाविद्यालय,पातुर
श्रीमती रेखाताई शेगोकार,उपाध्यक्ष,अंकुर साहित्य संघ
श्रीमती शीलाताई गहिलोत,माजी नगराध्यक्ष,साहित्यिक
प्रा.सदाशिव शेळके,प्रमुख मार्गदर्शक,अंकुर साहित्य संघ पुष्पराज गावंडे,सदस्य,महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळ,मुंबई समारोप कार्यक्रमात प्रशांत गावंडे,शेतकरी जागर मंच,अकोला रमेश अंधारे,साहित्यिक,अमरावती
रमेश थोरात,ज्येष्ठ नाट्यकर्मी,अकोला श्रीमती शोभा मेहेर, गटशिक्षणाधिकारी,पातुर श्री विजयसिंह गहिलोत,माजी प्राचार्य,व्यवस्थापक बेरार एज्युकेशन सोसायटी जयसिंग जाधव,माजी प्राचार्य,वसंतराव नाईक विद्यालय,पातुर
गजानन नारे विदर्भ साहित्य संघ अकोला देवेंद्र इंदलकर,शब्दवेल साहित्य संघ,पनवेल किशोर बळी,अक्षर प्रतिष्ठान,अकोला रवींद्र जवादे,सृजन साहित्य संघ,मुर्तीजापुर
लक्ष्मण दारमोडे व-हाडी कट्टा संजय देशमुख,लोक स्वातंत्र पत्रकार संघ शिवशंकर चिकटे,कवी विचार मंच,शेगाव डॉ.जब्बार पटेल,केंद्रीय उपाध्यक्ष,हिंगोली संदीप देशमुख,तरुणाई फाउंडेशन,कुटासा ११ मे रोजी सकाळी
९ वाजता “ग्रंथ दिंडी” चे आयोजन करण्यात आले आहे.उदघाटन समारंभ दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत होणार आहे.दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात कविता वाचन,विशेष सन्मान पुरस्कार,वितरण,पुस्तक प्रकाशन,जीवन गौरव पुरस्कार,अंकुर वांग्मय पुरस्कार,प्रकाशन सोहळा,साहित्य चर्चा,परिसंवाद,कथाकथन,पुस्तक प्रदर्शन,महिलांचे स्वतंत्र कवी संमेलन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या संमेलनात साहित्य, संस्कृती,समाजसेवा आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळणार असून, साहित्यिकांसाठी ही एक ऐतिहासिक संधी आहे.सर्व साहित्यप्रेमी,विद्यार्थी,नागरिक आणि रसिकांनी या संमेलनाला उपस्थित राहावे,असे आवाहन संमेलन पदाधिकारी देवानंद गहिले, कृष्णराव घाडगे,श्रीमती शीलादेवी गहिलोत, प्रा.विठोबा गवई प्रा.सदाशिवराव शेळके, डॉ. शांतीलाल चव्हाण,डॉ मनोहर घुगे यांनी केले आहे.
दोन दिवस भरगच्च अशा कार्यक्रमांचे आयोजन या साहित्य संमेलनामध्ये करण्यात आले आहे.तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अंकुर साहित्य संघाचे वतीने करण्यात आले आहे
