पातुर अकोला महामार्गावर विद्युत सब स्टेशन नजीक वळण मार्गावर दुचाकी स्वार हा सरळ मोठ्या नालिमध्ये पडल्याने गंभीर जखमी झाला. अकोला येथील रहिवासी शंतनु रवींद्र देशमुख हा दिनांक 2 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजता वाशिमहून आकोला कडे स्कुटी एम एच 30 बी के 68 41 गाडीने जात असताना

पातुर येथील एम एस ई बी सब स्टेशन जवळ वळण मार्गावर महामार्ग न दिसल्याने सरळ खोदकाम केलेल्या नालीत पडल्याने गंभीर जखमी झाला घटनेची माहिती पातुर पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहचून जखमीला पुढील उपचाराकरता अकोला येथे हलविण्यात आले. उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे डॉक्टरने घोषित केले या घटनास्थळी या अगोदर तिघांचा बळी गेला आहे या ठिकाणी विद्युत प्रकाश नसल्याने वळण मार्ग दिसत नाही याकरिता या ठिकाणी विद्युत रोशनी करणे गरजेचे आहे.