- तालुक्यातील विज्ञान शिक्षकांचा सहभाग
- विविध उपक्रम व स्पर्धा राबवण्यासाठी विज्ञान अध्यापक मंडळाने दिले प्रोत्साहन
सावित्रीबाई फुले विद्यालय येथे विज्ञान विषयक कार्यशाळा
पातूर प्रतिनिधी : दिनांक 4 जुलै 2025 रोजी सावित्रीबाई फुले विद्यालय पातुर येथे शिक्षण विभाग जिल्हा परिषद अकोला,शिक्षण विभाग पंचायत समिती पातुर,पातुर तालुका विज्ञान अध्यापक मंडळ तसेच सावित्रीबाई फुले विद्यालय पातुर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विज्ञान विषयक उपक्रम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते

या कार्यशाळेमध्ये सत्र 2025- 26 यामध्ये कोणकोणते विज्ञान विषयक उपक्रम राबविले जावेत याविषयीची माहिती दिली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव सचिन ढोणे यांची उपस्थिती लाभली होती. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुतूहल संस्कार केंद्राचे संस्थाध्यक्ष प्रा.डॉ.नितीन ओक,जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.रवींद्र भास्कर,पातुर तालुका विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष सुनील वावगे यांची उपस्थिती होती. तालुका अध्यक्ष सुनील वावगे यांनी वर्षभर राबवल्या जाणाऱ्या विज्ञान विषयक उपक्रमांचे नियम व अटी शर्ती सांगितल्या तसेच शिक्षण विस्तार अधिकारी रामेश्वर बोचरे यांनी विज्ञानामध्ये विद्यार्थी उपक्रमशील झाला पाहिजेत याविषयीची माहिती सांगितली या कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून कुतूहल संस्थेचे संस्थापक माननीय प्रा.डॉ.नितीनजी ओक सर यांनी इन्स्पायर अवार्ड प्रदर्शनी मध्ये नॉमिनेशन कसं करायचं,मॉडेल कसे निवडायचे,कल्पना कशी विस्तारित करायची,तसेच कोणते मॉडेल आणू नये याविषयी माहिती सांगितली जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.रवींद्र भास्कर सर यांनी राष्ट्रीय विज्ञान नाट्यस्सोव याविषयी माहिती सांगितली शिष्यवृत्ती परीक्षा संदर्भात सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले.

शिक्षण विभाग पातुर पंचायत समिती मधील शिक्षण विस्तार अधिकारी प्रवीण डाबेराव यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या उपक्रमामध्ये सहभागी करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले संस्थेचे सचिव तथा सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सचिन ढोणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून आपल्या तालुक्यातील विद्यार्थी विज्ञान विषयक उपक्रमात जास्तीत जास्त कसे सहभागी होतील आणि जिल्हा आणि राज्यावर आपल्या तालुक्यातील विद्यार्थी कसे पोहोचतील याविषयी शिक्षकांना माहिती सांगितली तसेच जिल्हा व तालुका विज्ञान अध्यापक मंडळाला त्यांनी काही उपक्रमाबाबत सुधारणा करण्यास सांगितले
विज्ञान विषयक कार्यशाळेला पातुर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मधील विज्ञान शिक्षक,खाजगी माध्यमिक शाळेमधील विज्ञान शिक्षक,तसेच कॉन्व्हेंट मधील विज्ञान शिक्षक,विज्ञान अध्यापक मंडळाचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती प्रा.डॉ.नितीन ओक यांनी शिक्षकांच्या शंकेचे निराकरण केले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावित्रीबाई फुले विद्यालयाचे प्राचार्य जे..डी.कंकाळ यांनी केले कार्यक्रमाचे संचालन श्रीकृष्ण शेगोकार यांनी केले तर आभार प्रदर्शन शिक्षण विभाग पंचायत समिती मधील विज्ञान विषय गट साधन व्यक्ती गोपाल महल्ले यांनी केले.