चान्नी येथील जय बजरंग कला महाविद्यालयाचा उपक्रम
सातदिवसीय रा.से.यो.शिबीरात विविध कार्यक्रम
योगेश नागोलकार रोखठोक न्यूज
राहेर:-पातुर तालुक्यातील चान्नी येथील जय बजरंग कला महाविद्यालयाच्या वतीने दि.२३ ते ३० जानेवारी दरम्यान दत्तक घेतलेल्या पिंपळखुटा येथे संत तुळसाबाई मंदीर प्रांगणात सात दिवशीय राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबीर आयोजित करण्यात आले होते . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जय बजरंग परिवाराचे मार्गदर्शक गजाननभाऊ इंगळे होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक डॉ. निलेशजी कडू, राष्ट्रीय सेवा योजना अकोला जिल्हा समन्वयक डॉ. सुधिरजी कोहचाळे, डॉ. अरविंद तट्टे, डॉ. सोनल कामे, डॉ. निलीमा दवणे, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. निलेश सोनोने, सुभाष वाहोकार,कपील खरप, महादेव राखोंडे,पंडीत वानखडे, मंगेश गाडगे ,वसंत ढोकणे सर, संजय गोपनारायण सर, आदी मान्यवर उपस्थित होते. या सात दिवसीय शिबिरादरम्यान शिबिरार्थींनी सर्वधर्मसमभावाची संकल्पना जोपासण्यासाठी भवानी माता मंदिर, उतावळी व मन या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले प्रसिद्ध महादेवाचे मंदिर, पुरातनकालीन राममंदिर,पवित्र मज्जिद, बुद्धविहार इत्यादी पवित्र स्थळांच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवले. सर्वधर्मीय लोकांसोबत संवाद साधला.उतावळी नदीवरील जलबंधारा बांधला. माता तुळसाबाई मंदिराच्या परिसरातील झाडांना आळे करून खतपाणी देण्याचे काम,ग्रामस्वच्छता अभियान… इत्यादी उपक्रम राबवले.प्राचार्य निवृत्ती वरखेडे यांनी प्रास्ताविकपर भाषणात सात दिवसीय उपक्रमांचा आढावा घेतला.ह.भ.प.निवृत्ती महाराज बोराडे यांनी मनोगत व्यक्त करताना ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायाचे महत्त्व समजावून सांगितले. रा.से. यो.शिबिरातील विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.प्राचार्य संग्रामजी इंगळे यांनी मार्गदर्शन केले. प्रा. निलेश सोनोने यांनी सूत्रसंचालन केले. कु.वैष्णवी घोरे यांनी आभार मानले.यशस्वीसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे गटप्रमुख गौरव खोंड, कु. कल्पना ठोसरे, संतोष इंगळे, अनिरुद्ध इंगळे, आदींनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
