प्रतिनिधी :
दि. 18 मार्च 2025
पातूर : पातूर शहरातील एका नामांकित महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांचा अभाव असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा आरोप युवा शिवसेना(उबाठा) ने केला आहे.

पातूर शहरातील नामांकित असलेल्या डॉ.एच.एन.सिन्हा महाविद्यालयात आज दि.१८ मार्च रोजी युवा शिवसेना (उबाठा) चे उपजिल्हा प्रमुख सागर रामेकर यांनी भेट दिली असता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.महाविद्यालयात असलेल्या पुरुष प्रसाधन गृहात नुकत्याच पार पडलेल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये वापरलेल्या कॉप्याचा खच पडलेला असून चक्क देशी दारूच्या बॉटल व तंबाखूजन्य गुटखा पुळ्या आढळून आल्या असून कमालीची अस्वच्छता दिसून आली.तसेच अपंग विद्यार्थ्यांकरिता रॅम्प शौचालय देखील उपलब्ध नाही.त्याहीपेक्षा गंभीर बाब पिण्याच्या पाण्याबाबत पहावयास मिळाली.पिण्याच्या पाण्यासाठी लावलेल्या वॉटर कुलर मध्ये बारीक कीटक व कीटकांची अंडी पाण्यावर तरंगताना दिसली.महाविद्यालयातील विद्यार्थी हेच पाणी पीत असल्याने त्यांच्या आरोग्याशी महाविद्यालय प्रशासन खेळ करीत आहे.तसेच कॉलेज मधील कॅन्टीन ही विद्यार्थ्यांसाठी असताना देखील कंपाउंडच्या बाहेरून सुरू केली आहे जेणेकरून महाविद्यालयाच्या समोरच असलेल्या बसस्थानकावर देखील धंदा करता येईल अशी व्यवस्था केली असून सदर कॅन्टीन ही महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या जववळची व्यक्ती चालवत असल्याने प्राचार्य महोदयांची त्यास मुकसंमती आहे.याबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य यांना संपर्क केला असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
सदर परिस्थिती पाहता युवा शिवसेना(उबाठा) चे उपजिल्हा प्रमुख यांनी संतप्त प्रतिक्रिया देत याप्रकरणी जिल्हाधिकारी व युजीसी ला तक्रार करणार असल्याचे सांगितले.तसेच यावर कारवाई नं झाल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेणार असल्याचे बोलून दाखविले आहे
