साने गुरुजी मंडळ,व कान्होबा बचत गट,आणि स्वामी विवेकानंद युवती मंडळ यांच्या वतिने आयोजन
पातुर प्रतिनिधी –
पातुर येथे पाटिल मंडळी मध्ये दि.८ मार्च दुपारी चार ला साने गुरुजी मंडळ,व कान्होबा बचत गट,आणि स्वामी विवेकानंद युवती मंडळ,पातुर यांच्या वतिने ॲड. शुभांगी राखोंडे आणि प्रिया निमंकडे पल्लवी मांडवगणे (राखोंडे) यांच्या नेतृत्वाखाली महिलाचा कलागुणांना प्रोत्साहन करुन रांगोळी स्पर्धेचे महिला सन्मान करुन साजरा करण्यात आला.यावेळी माता जिजाऊ, अहिल्याबाई,सावित्रीआई ,रमाई यांच्या फोटो पुजन जेष्ठ महिलाजेष्ठ महिला ज्योतीताई पाटील व प्रमुख पाहुणे म्हणून वैशाली पाटील, विद्याताई पाटील,दिपालीताई हिरळकार प्रियाताई राहुल निमकंडे ,जयाताई हिरळकार यांच्या हस्ते करुन कार्यक्रमाची सुरुवात केली उपस्थित मान्यवराना वृक्ष कापडी पिसवी देऊन सन्मानित करण्यात आलेख रांगोळी स्पर्धतील तिनं महिला व युवती ला बक्षिसे देऊन महिला व बालविकास अधिकार बाबत पुस्तिका देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणावर महिला मंडळींची युवती ची उपस्थित होती सर्वानी महिलांचे हक्क अधिकार बाबत मनोगत व्यक्त केले.रांगोळी स्पर्धेमध्ये प्रथम भारती सुरेंद्र तायडे द्वितीय आरती सुरेंद्र तायडे तसेच तृतीय प्रतिक्षा दिनेश तायडे यांचे बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला तसेच कार्यक्रमाची प्रास्ताविक ॲड.शुभांगी उमाळे (राखोंडे) तसेच सूत्रसंचालन पल्लवी मांडवगणे राखोंडे आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रियाताई निमकंडे यांनी केले तर अंजली उगले,वैष्णवी पाटील,पुनम तिडके,ज्योती राखोंडे आणि इतर युवती व महिला उपस्थित राहुन कार्यक्रमा लाभ घेतला होती.
