पातुर शहराला नवीन पाईप द्वारे पाणीपुरवठा होत असून टी के व्ही चौकातील पाईपलाईन ही वारंवार लिकेज झाल्याने व्यापाऱ्यांना व नागरिकांना ये जा करण्यास मोठा त्रास होत आहे

नगरपरिषद कर्मचारी हे लिकेजचे थातुर मातुर काम करतात आणि निघून जातात त्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर त्या खोदकामाचे मातीचे ढीगारे असतात याठिकाणी लिकेच्या पाण्याने सर्वत्र चिखल हा तयार होतो त्यामुळे व्यापाऱ्यांना या ठिकाणी मोठ्या संकटासमोर जावे लागते याबाबत चौकातील सर्व व्यापाऱ्यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी सय्यद ऐसानोदिन यांना निवेदन दिले घटनेचे गांभीर्य पाहता मुख्य अधिकारी यांनी ताबडतोब संबंधित पाणीपुरवठा विभागाचे अभियंता व कर्मचाऱ्यांना चांगलेच धाऱ्यावर धरले व संबंधित प्रश्न हा दोन दिवसात निकाली काढण्याचे आदेश केले