फरहान अमीन यांच्यावतीने इफ्तार पार्टचे आयोजन
पातूर प्रतिनिधी :-
इफ्तार पार्टी हा एकता सदभावनेचा संदेश असून अशी इफ्तार पार्टी भविष्यात ही आयोजित करण्यात यावे असे प्रतिपादन विधानपरिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांनी केले.पातुर येथील ग्रन्ड महेफिल हाॅटेल येथे इफ्तार पार्टी चे आयोजन राष्ट्रवादी व विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव फरहान अमिन यानी केले होते.

या इफ्तार पार्टी मध्ये शहरातील विविध क्षेत्रातील तथा सर्व समाजाचे नागरिकांची उपस्थिती लाभली.मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार अमोल मिटकरी हे होते तर प्रमुख अतिथी आयुर्वेद महाविध्यालयाचे संचालक डाॅ.साजिद शेख,सामाजिक कार्यकर्ते धनंजय मिश्रा, प्रशांत निकम अ.करिम सर, डॉ वकार अन्सारी,किराणा असोसिएशनचे अब्दुल कुद्दुस, डॉ.असोशिएशन चे अध्यक्ष डॉ.नंदकिशोर राऊत अ भा मराठी पत्रकार संघांचे तालुका अध्यक्ष सतिश सरोदे आदि मान्यवर उपस्थित होते.

तसेच पातुर शहरातील सर्व पत्रकार मंडळी सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते.महीला पत्रकार या कार्यक्रमाला उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे संचालन धनंजय मिश्रा यानी केले.तर आभार प्रदर्शन फरहान अमिन यानी केले इफ्तार पार्टी कार्यक्रम यशस्वी करण्या करिता पत्रकार नातिक शेख,सैय्यद साद,सय्यद फैजान,नाझिम शेख,तौकिर अहेमद,खिजर खान यानी परिश्रम केले.