पातुर प्रतिनिधी मेघालय येथे बॉक्सिंग ऑफ इंडिया या संघटनेतर्फे राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन शिलॉंग येथे करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये देशातून शेकडो युवक यांनी बॉक्सिंग स्पर्धेमध्ये भाग घेतला पातुर येथील समीर अहमद अब्दुल गणी या युवकांनी बॉक्सिंग स्पर्धेमध्ये विजय प्राप्त केल्याने त्याचे आज पातूर येथील जुने बस स्थानक येथे मोठ्या अध्यक्ष स्वागत केले.

यावेळी माझी नगराध्यक्ष ईद्धू पैलवान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष गुड्डू पैलवान, कृष्णा बोंबटकार, दुलेखा भाई, प्रदीप काळपांडे, शाकीर भाई, इरफान भाई, चांद भाई, मोहम्मद मेहताब शबीर डॉन यांच्यासह युवकांनी समीर अहमद यांचे स्वागत केले
