विज्ञान शाखेचा निकाल ९९% आणि कला शाखेचा निकाल ८३% लागला
पातूर प्रतिनिधी :- शाहबाबू एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित शाहबाबू ज्युनियर कॉलेज पातूरने चांगल्या निकालांची परंपरा कायम ठेवली आहे आणि यावर्षीही जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे.या वर्षी शाहबाबू ज्युनियर कॉलेजच्या विज्ञान शाखेतून ३५९ विद्यार्थ्यांनी परीक्षेत प्रविष्ट झाले होते त्यापैकी ३५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेत १०१ विद्यार्थी प्रविष्ट झाले, त्यापैकी ८३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.अशा प्रकारे,विज्ञान शाखेत २१ विद्यार्थी डिस्टिंक्शन श्रेणीत उत्तीर्ण झाले,प्रथम श्रेणीत १३५,द्वितीय श्रेणीत १५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.अरहम हसन वसीम ८९.८३%शिजा सहर साई.आमिर ८४.८३%फैजा सय्यद फिरोज ८४.५०% तुबा सरफराज खान ८३.५०% बहेशती अदनान अहमद ८३% सिद्रा फिरोज खान ८२.३३%
सै.साद सै साजिद हुसेन ८२.१७% साद काशिफ ८१.८३%
युसरा एहतेशाम उल्ला ८१.६७% साद तल्हा इश्तियाक हुसेन ८१.१७% गुणांसह उत्तीर्ण झाले.कला शाखेतून सीमा परवीन अब्दुल अन्सार ८३%,सानिया परवीन शकील शाह ८१.३३%,
मुस्कान परवीन अब्दुल अन्सार ८०.६७ सानिया फिरदोस कलीमोदिन ८०.५०% गुणांसह उत्तीर्ण झाले.शाहबाबू एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सैय्यद इसहाक राही सर यांनी सर्व यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय त्यांचे पालक,संस्था सचिव राही सर,प्राचार्य मुजीबुल्ला सर,उपप्राचार्य अहसान सर आणि सर्व शिक्षकांना दिले.