पातुर (प्रतिनिधी)वसंतराव नाईक विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पातूर येथे आज दिनांक 12 जानेवारी 2025 ला स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री एस.एम.सौंदळे यांनी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण केले. यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वामी विवेकानंद व आई जिजाऊ यांच्या जीवन चरित्रावर आधारित समायोचित भाषणे झाली.या या कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते.
