अकोला प्रतिनिधी
अकोला जिल्हा होमगार्ड समादेशक,तथा अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांतजी रेड्डी यांच्या हस्ते सत्कार मुर्ती केंद्र नायक राजेंद्र शेळके यांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सन्मान पुर्वक सत्कार करण्यात आला.

राजेंद्र शेळके अकोला येथे सन 2022 पासून कार्यरत होते.साडेतीन वर्षाच्या कालावधीमध्ये अत्यंत चोख कर्तव्य सेवा दिली.केंद्र नायक म्हणून जालना येथे त्यांची पदोन्नतीने बदली झालेली आहे.यांच्या जागी अमरावती येथून पलटण नायक सुनील पोहरे यांची पदोन्नतीने बदली झाली. सामग्री सुभेदार बालक डोंगरे यांची पलटण नायक पदोन्नतीने धाराशिव येथून रद्द करून वाशिम येथे बदली झाली आहे.त्यानिमित्ताने अकोला,अकोट,पातुर पथकाच्या वतीने राजेंद्र शेळके यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष होमगार्ड जिल्हा समादेशक चंद्रकांतजी रेड्डी होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून नव्याने रुजू झालेले प्रभारी प्रशासकीय अधिकारी शिवाजीराव आघाव,केंद्र नायक सुनील पोहरे,अभिषेक देशमुख,पलटण नायक बालक डोंगरे मंचावर उपस्थित होते.

निरोप समारोपीय कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष होमगार्ड जिल्हा समादेशक यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच अकोला पथकाचे मानसेवी अधिकारी पलटन नायक दिपक सुर्यवंशी,पातुर पथक संगीता इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले.व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. राजेंद्र शेळके यांनी सत्कार स्वीकारून मनोगत व्यक्त केले

कार्यक्रमाला,समादेशक सुरेश नाठे,राजु खडसे,संगीता इंगळे,मानसेवी अधिकारी दिपक सुर्यवंशी,अशोक इंगळे,प्रेम दामोदर,अँड देशमुख,अतुल वानखडे,दांडगे,राऊत,पांडे सरोदे अनिल गावंडे सावळे,इस्माईल भाई,बिसेन,राजपूत,मानसेवी अधिकारी,मानसेवी होमगार्ड सह जिल्हा कार्यालयाचे कर्मचारी सावते सह होमगार्ड सैनिक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभारप्रदर्शन पलटन नायक बालक डोंगरे यांनी केले.निरोप समारंभ समारोपीय कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.हा कार्यक्रम यशस्वी अकोला पथकातील होमगार्ड सैनिकांनी सहभाग घेतला होता